अंबा भुवन कार्टर रोड ७ येथे भाजपा नेते स्व.ओम प्रकाश मिश्रा यांच्या २६ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ओम प्रकाश प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत पुजारी यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन खा. जनसेवक गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले व रक्त दात्याना प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले.
या शिबिरात बोरीवली ब्लड सेंटर च्या सहकार्याने ७० रक्त दात्यानी रक्तदान केले. पुण्यतिथीच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांसाठी महाभंडारा आयोजित करण्यात आला. नगरसेवक ते खासदार ह्या प्रवासात अनेकदा अनेक अडथळ्यांशी कसा सामना करावा लागला हे गोपाळ शेट्टी यांनी या वेळीं बोलताना अनेक प्रसंग सांगितले,गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीच मी पुढील काळातही कार्यरत रहाणार असल्याचे प्रतिपादन मनोदय या प्रसंगी बोलताना शेट्टी यांनी व्यक्त केला. सामाजिक कार्यात काम करताना सचोटी व प्रामाणिकपणा अंगी असणे आवश्यक असून त्या माध्यमातून जनसेवा करावी हीच खरी ओम प्रकाश मिश्रा याला खरी श्रद्धांजली असेल असेही शेट्टी यांनी सांगितले. अंबा भुवन व गीता भवनच्या रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत झोपू प्राधिकरणाकडून ३०० फुटाचे घर मिळवून देणारच असे आश्वासन या प्रसांगी गोपाळ शेट्टी यांनी उपस्थतांना दिले.
या प्रसंगी श्रीकांत पांडे, ब्रम्हदेव तिवारी, विद्यार्थी सिंग,मयूर ओव्हसीयर, डॉ.योगेश दुबे,सुधीर परांजपे,अजय उतेकर,के पी राजन आदी मान्यवर व मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक व प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments