पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे भाजपकडून AI फोटोंचा वापर!
भाजपने मदतकार्य आणि सीमा सुरक्षेला प्राधान्य द्यावे, द्वेषप्रचाराला नाही - सुजात आंबेडकर
How’s someone’s first thought after a terrorist attack is to take a disturbing image from the attack, prompt AI to turn it into Ghibli style image and then use the image to spread hate based propaganda? @BJP4India’s priority right now should be rescue operations, securing the… https://t.co/JnNaVPNNvE
— Sujat Ambedkar (@Sujat_Ambedkar) April 23, 2025
पुणे : वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भाजपकडून एआयच्या मदतीने पीडीत लोकांचे 'घिबली' शैलीत रूपांतरित करून त्याचा वापर द्वेषपूर्ण प्रचारासाठी केल्याच्या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, अशा संकटाच्या काळात एखाद्याच्या मनात असा विचार कसा येतो की, हल्ल्यातील प्रतिमा वापरून द्वेष पसरवावा?
सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पक्षाची सध्याची प्राथमिकता बचावकार्य, प्रभावित क्षेत्रांची मदत आणि सीमासुरक्षा असावी, द्वेष पसरवणे नव्हे. त्यांनी असेही सूचित केले की, संकटाच्या काळात समाजात एकता आणि सहकार्याची भावना वाढवणे आवश्यक आहे, द्वेषप्रचार नव्हे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर, विविध राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी द्वेष प्रचाराच्या विरोधात एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे.

0 Comments