Arey colony Goregaon|आरे कॉलनी गोरेगावमध्ये सुरक्षा विभागाची अनधिकृत बांधकामावर बेधडक कारवाई!
युनिट क्रमांक ३१ येथील बाळा स्वामी यांच्या अनधिकृत बांधकाम सुरक्षा अधिकारी विजय वाघ यांचा हातोड्यानी भुईसपाट....
मुंबई प्रतिनिधी:-
गोरेगाव पूर्व येथील आरे मिल्क कॉलनी मध्ये मोठ्या प्रमाणात सरकारच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याची माहिती मला अनेकदा स्थानिकांकडून मिळत असते.त्या संदर्भात मी वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा करत असतो.
परतू पाठपुरावा करत असताना मला एक व्यक्तीक अनुभव आला आहे.काही भ्रष्ट पत्रकार ह्या अनधिकृत बांधकामाला शह देण्याचे काम करत आहे.सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार मला खोट्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये गोवण्याचे षडयंत्र स्थानिक पत्रकार हे ठेकदार यांच्या सह हात मिळून षडयंत्र करत असल्याची माहिती मला मिळाली आहे.मी लवकर त्या पत्रकाराची ED,CBI, इन्कम टॅक्स विभागा मार्फत चौकशीची मागणी करणार आहे.
आरे हे मुंबईचे हे हृदय आहे.आरे वाचावे ही सर्वसामान्य माणसाची मागणी आहे.आरे मुळे मुंबईला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा होत असतो.जर आरे नष्ट झाले तर मुंबईचे हाल होतील,परतू काही पत्रकाराच्या नावाला काळिमा फासवणाऱ्या पत्रकारांमुळे आरे हे भकास होत आहे.लवकरच त्यांचा मुखवटा आम्ही सर्वांसमोर फाडू.
(सिद्धार्थ काळे )
असेच एक मोठे बांधकाम शासनाच्या मोकळ्या भूखंडावर ठेकेदार बाळास्वामी हे यूनिट क्रमांक ३१ येथे माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांच्या घराच्या शेजारी करत असल्याची माहिती मला सूत्रांकडून मिळाली.
मी लगेच याबाबत आरे प्रशासनाला लेखी तक्रार अर्जाद्वारे कळवले आणि पाठपुरावा केला त्यानंतर आरेचे डॅशिंग सुरक्षा अधिकारी विजय वाघ यांनी तात्काळ त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करून संपूर्ण बांधकाम भुईसपाट करून टाकले त्यामुळे पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व आरेवासीयांनी विजय वाघ यांचे अभिनंदन केले आहे.
अशाच प्रकारे सरकारच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडावर बांधकाम अनेक ठिकाणी सुरू आहे.
"आरे मधील जेथे जेथे अनधिकृत अवैध्य कामे होता आहे त्या ठिकाणी आम्ही कडक कारवाई करू आरे कॉलनी ही आमची जबाबदारी आहे.आरे मधील कोठेही काही अनधिकृत कारवाया होत असेल तर आम्हाला कळवा आम्ही त्वरित तेथे ॲक्शन घेऊ."
(सुरक्षा अधिकारी विजय वाघ)
आरेतील युनिट क्रमांक 29 येथील शौचालयाच्या शेजारी दहा दिवसापूर्वी 30 बाय 40 चे बांधकाम करून लक्ष्मण नामक व्यक्तीने मोकळ्या जागेत गोदाम बनवले आहे.
नुकतेच समता कॉलनी या ठिकाणी दोन जिवंत वृक्ष तोडून एका मुस्लिम व्यक्तीने पंधरा बाय वीसचे बांधकाम केले आहे.
तसेच फिल्टर पाडा या ठिकाणी देखील पंधरा-वीस दिवसापूर्वी चाळीस बाय पन्नास चे मोकळ्या जागेत बांधकाम झाले आहे.
युनिट क्रमांक ३१ या ठिकाणी देखील रस्त्याच्या शेजारीच कापसे यांच्या घराच्या शेजारी मोकळ्या भूखंडावर वीस बाय वीस चे दोन रूम बनवण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे युनिट क्रमांक ३१ या ठिकाणी सात ठिकाणी माळ्यांचे वन प्लस वन काम झाले आहे. मुख्य म्हणजे रस्त्याच्या शेजारीच रेशन दुकानाच्या समोरच भर वस्तीमध्ये हे माळ्याचे बांधकाम झाले असून बनकर या ठेकेदाराने हे माळ्याचे काम केले आहे.
या सर्व गंभीर गोष्टींचे माहिती आम्हीं मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिरपूरकर तसेच डॅशिंग सुरक्षा अधिकारी विजय वाघ यांना दिली आहे आम्हाला खात्री व आशा आहे त्या ठिकाणी देखील ते अशाच प्रकारची तोडक कारवाई करून आरेतील बेकायदा बांधकामावर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतील.





0 Comments