मागाठाणे विधानसभेतील प्रश्नांवर तात्काळ कार्यवाहीसाठी-भाजपा आ. प्रविण दरेकरांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट
मुंबई - मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विविध प्रश्नांच्या समस्यांवर उपाययोजना करून तात्काळ कार्यवाही करण्यासाठी आज भाजपा गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबई महानगरपालिका कार्यालयात आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली.
आमदार प्रविण दरेकर यांनी मनपा आयुक्त भूषण गगराणी यांना दिलेल्या निवेदनात दहिसर पूर्व, चेकनाका ते समतानगर दरम्यान सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी चालू करून अनेक अनधिकृत रिक्षा, टू-व्हीलर गॅरेज, सर्व्हिस सेंटरवर कारवाई करण्याबाबत, संजीवनी हायस्कुल वैशाली नगर ते पश्चिम दृतगती महामार्गापर्यंतचा रस्ता खुला करण्याबाबत, शिववल्लभ क्रॉस रोड, ठाकूर कंपाउंड, राजतरंग बिल्डिंगसमोरील डीपी रोड विकसित करण्याबाबत, रावळपाडा येथील प्रसूतीगृह पूर्णतः चालू झालेले असले तर त्याच्यामध्ये सुरु असलेल्या आरोग्य सेवा सुविधांची माहिती मिळावी, मारुती नगर येथील डीपी रस्ता चालू करणेबाबत, अशोकवन मनपा शाळा विकसित करणेबाबत, संभाजीनगर, अशोकवन, दहिसर (पूर्व) येथील मनपा मंडई चालू करणेबाबत, संभाजीनगर येथील नाला आच्छादीत करण्याबाबत, संभाजीनगर ते एन.जी पार्क येथील डीपी रस्ता चालू करावा, चोगले नगर ते नँसी डेपो पर्यंतच्या डीपी रस्त्याच्या सद्यस्थितीबाबत, सी. टी. आय. आर. सी, अभिनव नगर बोरिवली येथे यूपीएससी आणि एमपीएससी सेंटरसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवळ, पश्चिम दृतगती महामार्ग पुलाखाली अद्यावत सोई-सुविधायुक्त शौचालय उभारण्याबाबत, कुलूपवाडी ते गुलमोहर, कुलूपवाडी ते देवीपाडा रस्ता करून डीपी रस्ता विकसित करण्याबाबत, टीसीएस इमारतीपासून पश्चिम दृतगती महामार्ग मस्जिदपर्यंतचा कै. खांडेकर मार्ग रुंदीकरण करून विकसित करण्याबाबत, फुलपाखरू उद्यान टाटा पावर हाऊस, पश्चिम दृतगती महामार्गावरील अतिक्रमणाबाबत, सिद्धार्थ नगर ते देवीपाडा येथील जोडणारा डीपी रस्ता सुरु करण्याबाबत, वॉर्ड क्रमांक २५ येथील आकुर्ली प्रसूतीगृह नूतनीकरण करून मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयाची निर्मिती करावी, ठाकूर व्हिलेज येथे अग्निशमन केंद्र कामाच्या सद्यस्थितीबाबत, नगर भुमापन क्र. ८०९/अ /१९ अ/१/१/१क/२ मौजे पोईसर स्मशानभूमीच्या आरक्षणात बदल करून त्या ठिकाणी वाहनतळ, मंडई मार्केटची निर्मिती करण्याबाबत, ठाकूर कॉलेज समोरील रस्त्याच्या कामाच्या, ठाकूर व्हिलेजमधील भूमिगत वाहनतळाच्या सद्यस्थितीबाबत, सिंग इस्टेटमधून लोखंडवाला येथे जाणाऱ्या १२० रस्त्याच्या स्थितीबाबत, महाराणा प्रताप चौक ते दामू नगर पर्यंतचा रस्ता विकसित तसेच मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करण्याबाबत, ठाकूर व्हिलेज परिसरात महानगरपालिकेच्या जलतरण तलावाची निर्मिती करण्याबाबत, कांदिवली (पूर्व) येथील समता नगर मनपा शाळा आणि मागाठाणे मतदार संघातील मनपा उद्यान/मैदाने विकसित करण्याबाबतच्या मागण्यांचा समावेश आहे.
00000

0 Comments