Header Ads Widget

Responsive Advertisement

Piyush Goyal:उत्तर मुंबईत विशाल कौशल्य विकास केंद्राची उभारणी आणि लाखो युवकांना नोकरी ची संधी उपलब्ध होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उत्तर मुंबईत विशाल कौशल्य विकास केंद्राची उभारणी आणि लाखो युवकांना नोकरी ची संधी उपलब्ध होणार : पीयूष गोयल 

केंद्रीय कौशल्य विकास मंत्री श्री जयंत सिंह यांच्या उपस्थितीत केंद्रीय वाणिज्य मंत्री खासदार श्री पीयूष गोयल यांची घोषणा 

मुंबई, 23 ऑगस्ट 2024: आज उत्तर मुंबई खासदार केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री पीयूष गोयल यांनी कांदिवली पूर्व येथील कल्पतरू टॉवर येथे महत्वपूर्ण बैठकीत केंद्रीय कौशल्य विकास मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री जयंत सिंह यांच्या उपस्थितीत उत्तर मुंबईत कांदिवली पूर्व आणि बोरिवली पश्चिम येथे दोन कौशल्य विकास केंद्र उभारणी बाबत माहिती दिली. यावेळी मुंबई पालक मंत्री आ.मंगल प्रभात लोढा, माजी खा.गोपाळ शेट्टी, आ.अतुल भातखळकर, आ प्रवीण दरेकर 


आ. सुनील राणे,आ.प्रकाश सुर्वे हे देखील उपस्थित होते.

उत्तर मुंबई उत्तम मुंबईत परिवर्तित करण्याचा दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे सांगत श्री गोयल महणाले की, 

"1 लाख स्क्वेअर फूट जागेवर कौशल विकास केंद्रात मुंबईतील युवा पिढी चे हजारो युवक युवती विभिन्न क्षेत्रात तज्ञ होऊन परत याच कौशल्य विकास केंद्राचा मार्फत नोकरी वर रुजू होणार." असे लाखो युवकांना नोकरीची संधी सुध्धा या कौशल विकास केंद्र मार्फत उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत कौशल्य विकास केंद्रात विभिन्न कोर्सेस आणि त्यासाठी आवश्यक तज्ञ शिक्षक विषयात महत्वपूर्ण निर्णय घण्यात आले. Earn and learn या कौशल्य विकास केंद्राचे वैशिष्ट असणार असेही शी पीयूष गोयल यांनी नमूद केले.

यावेळी केंद्रीय कौशल्य विकास मंत्री श्री जयंत सिंह,महाराष्ट्र राज्य मुंबई पालक मंत्री श्री मंगल प्रभात लोढा, माजी खा.गोपाळ शेट्टी, आ.अतुल भातखळकर, आ.श्री प्रवीण दरेकर, आ.प्रकाश सुर्वे, आ. सुनील राणे 

महापालिक अतिरिक्त आतुक्त बांगर, उपायुक्त भाग्यश्री कापसे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, महामंत्री सर्व बाबा सिंह, दिलीप पंडित, निखिल व्यास, कांदिवली पूर्व अध्यक्ष अप्पा बेलवलकर आणि कौशल्य विकास केंद्राचा उभारणी साठी या विभागातील तज्ञ उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post a Comment

0 Comments