Header Ads Widget

Responsive Advertisement

Buldhana|मेहकर मतदार संघात वाढला सिद्धार्थ खरात यांचा जनसंपर्क

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Buldhana|मेहकर मतदार संघात वाढला सिद्धार्थ खरात यांचा जनसंपर्क 


नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून,प्रत्यक्ष नागरिकांशी संवादावर दिला भर 




मेहकर/प्रतिनिधी :-

विधानसभा निवडणुक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे,२०२४ च्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन आठवड्या नंतर कधीही लागू शकते अशी परिस्थिती आहे. त्यातच मेहकर लोणार विधान सभा निवडणुक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या सिद्धार्थ खरात यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव पदाचा राजीनामा देऊन आपला पाय मोकळा करून घेतला आहे,आता ते मेहकर निवडणुक लढणार असल्याचे निच्छित झाले असून उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) कडून म्हणजेच महाविकास आघाीतर्फे त्यांची उमेदवारी जवळपास निच्छित मानली जात असून औपचारिक घोषणा बाकी असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर ते गेल्या अनेक वर्षांपासून शिव,शाहू,फुले, आंबेडकरी चळवळ आणि वारकरी संप्रदाय संत एकनाथ, संत नामदेव,संत तुकाराम यांच्या विचारधारेला धरुन अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांचा सहभाग राहिला आहे, त्याच बरोबर ते अत्यंत ग्रामीण भागातून शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबातून आलेले असल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब कष्टकरी कामगार, महिलांच्या समस्या, तरुण पिढी युवकांच्या अडचणी ते प्रत्यक्ष जाणून आहेत म्हणून सामाजिक जान,भान ठेवून ते येथील शेतकऱ्यांच्या मालाला भाव शेतमजुरांच्या,तरुण युवकांच्या हाताला काम, अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेहकर लोणार विकास आराखड्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी आणि नविन नविन उपक्रम राबवून येथील सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात उत्कर्ष पेरण्या साठीच ते निवडणुक लढणार असल्याने ते ग्रामीण भागात जाऊन शेवटच्या घटकाला भेटत आहेत, नागरिकांशी, तरुण युवकांशी चर्चा करत आहेत, गावगाड्यात जाऊन भेटी गाठी घेत आहेत. त्यांचा एकंदरीतच जनसंपर्क साधण्यावर भर असून त्यांना आपल्या पदाचा येथकिंचीतही गर्व नसल्याने सर्व सामान्य माणसाच्या हृदयात आपले स्थान निर्माण करत आहेत. त्यांच्या उबाठा (शिवसेना) प्रवेशाची तारीख सुद्धा फायनल झाल्याची बातमी सूत्रांकडून समजते आहे. ते लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिव बंधन बांधून पुन्हा एकदा जोमाने निवडणुक रिंगणात उतरणार असल्याची खात्री लायक माहिती आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post a Comment

0 Comments