Header Ads Widget

Responsive Advertisement

Jalna district| राजूर येथे शिव भक्त यांच्याकडून मालवण येथील राजकोट किल्ला येथील झालेल्या दुर्दैवी घटने बाबत आंदोलन.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Jalna district| राजूर येथे शिव भक्त यांच्याकडून मालवण येथील राजकोट किल्ला येथील झालेल्या दुर्दैवी घटने बाबत आंदोलन.



जालना जिल्हा प्रतिनिधी:-


4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून मालवण नजीक राजकोट किल्ल्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकारने त्यावेळी मोठा इव्हेंट करून या पुतळाचे अनावरण केले होते, तो पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. 

छत्रपती श्री शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे,सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करत असेल आणि राजकारण करत असताना छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अपमान विडंबन करत असेल तर आम्ही शिवप्रेमी शिवभक्त हे कदापि सहन करणार नाही. 


छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या वास्तू आणि किल्ले आज देखील सुरक्षित आहेत.

 परंतु सहा महिन्यापूर्वी निर्माण केलेले वास्तु कोसळत असेल तर त्यात कुठेतरी भ्रष्टाचार झालेला आहे संबंधित अधिकारी तसेच जयदीप आपटे,डॉ. चेतन एस पाटील यांची देखील चौकशी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक राजुर गणपती ता. भोकरदन जि .जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळा येथे निषेध व्यक्त करुन राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

यावेळी या आंदोलनांमध्ये प्रामुख्याने आंदोलनात सहभागी शिव भक्त सचिन फटाले,योगेश नागवे सर,राजु मिसाळ सर ,शंकर जाधव,मुकुल जुंबड,अदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post a Comment

0 Comments