Header Ads Widget

Responsive Advertisement

Narayan Rane and son Nilesh Rane|पत्रकार पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या त्यांच्या पोशाखाला हात लावणाऱ्या खा. नारायण राणे व पुत्र निलेश राणेवरती गृहमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Narayan Rane and son Nilesh Rane|पत्रकार पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या त्यांच्या पोशाखाला हात लावणाऱ्या खा. नारायण राणे व पुत्र निलेश राणेवरती गृहमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी

संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी, सोशल मीडिया काँग्रेस कमिटी व पत्रकार संरक्षण समिती यवतमाळ, जिल्हा यांची मागणी...!



यवतमाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणीमधील राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळाले व त्यावेळी नारायण राणे, निलेश राणे उपस्थित होते. या संदर्भातलं वार्तांकन करण्यासाठी एबीपी माझाचे रिपोर्टर घटनास्थळी हजर होते. त्यावेळी नारायण राणे पोलिसांसोबत बोलत होते. त्याचवेळी एबीपी माझाचा माईक नारायण राणेंनी पाहिला आणि आक्रमकपणे त्यांनी तो माईक ओढण्याचा प्रयत्न केला व रिपोर्टर सोबत दमदाटी केली.

दरम्यान तणावाच्या वातावरणा मध्ये पोलीस बांधव सामंजस्याची भूमिका घेत होते पण निलेश राणे यांनी पोलिसांशी अरेरावी केली . हूज्जतबाजी केली आणि त्यांच्या पोशाखाला हात लावला. तात्काळ गृहमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी वरून खा. पिता-पुत्रावर असभ्य भाषा असभ्य वर्तवणूक केल्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी करिता संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी,

सोशल मिडिया काँग्रेस कमिटी व पत्रकार संरक्षण समिती यवतमाळ यांच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यवतमाळ जिल्हा यांच्या माध्यमातून मा. गृहमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष कृष्णा पुसनाके , संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सचिन मनवर , प्रा. पंढरी पाठे , "पत्रकार संरक्षण समिती" चे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक यंगड , उपाध्यक्ष श्रीकांत देशमातुरे , सचिव वसीम शेख , विनोद पत्रे , अनिल चवरे , प्रकाश कांबळे , अशोक जोगदंड व कलीम खान इत्यादी पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post a Comment

0 Comments