(आरोपी रफिक पठाण)
मुंबई प्रतिनिधी:- सध्या महाराष्ट्र मध्ये चालय तरी काय? महाराष्ट्र बिहारच्या वाटेवर आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होताना दिसत आहे.
बदलापूर येथील शाळेत लैंगिक अत्याचाराची भयंकर घटना घडल्याचे प्रकरण उघडकीस येऊन त्याचे पडसाद उमटत असतानाच नालासोपारा येथील एका शाळेतही शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याच बरोबर बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा तालुक्यात किनगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थिनीचा विनय भंग केला असल्याची माहिती समोर आली आहे. चांदिवली संघर्ष नगर येथे देखील एका चिमुरडीवर अत्याचार झाला आहे.हे थांबता ना थांबता... मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये आरोप मानसिक रोगी असल्याचे सांगण्यात येत होते. परंतू तसे काही नसल्याचे सिध्द झाले आहे. राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. मागील 2 दिवसांत कोल्हापूर, अकोला आणि 2 मुंबईत अशा घटना समोर आल्या आहेत. अशातच पुन्हा मुंबईतून एक विनयभंगाची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रविण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. याबाबतीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण राणे यांच्या मार्गदर्शनात तत्काळ आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.आरोपी मानसिक रुग्न असल्याची केवळ अफवा आहे असे काही नाही. असे स्थानिक लोकांकडून आणि पोलिसांकडून यावेळी सांगितले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आला आहे. मानसिक रुग्ण असलेल्या तीस वर्षीय आरोपीने बारा वर्षीय आणि अडीच वर्षीय अल्पवयीन मुलींना आपला प्रायव्हेट पार्ट दाखवून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी आणि शेजाऱ्यांनी आरोपीला दम देखील भरला होता. 8 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर तो आरोपी पळून गेला.
याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी समता नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक केली आहे. सध्या समता नगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान बदलापूर प्रकरणाने जोर पकडला आहे. याबाबत लोकांचा निषेध होत आहे. त्यावर आता राजकारणही सुरू झाले आहे. राजकीय पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे. या सगळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातही अत्याचाराची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे सरकारने ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.
याप्रकरणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम यादव यांनी सांगितले की, आरोपी रफिक पठाण अनेक दिवसांपासून रात्री उशिरा या भागात महिलांच्या कपड्यांसह अश्लील कृत्य करताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे कारवाई केली..पण मुलींसोबत असभ्य कृत्य होत असल्याची माहिती मिळताच ते पीडितेच्या कुटुंबीयांना घेऊन गुरुवारी पोलीस ठाण्यात गेले..राधेश्याम यादव यांनी सांगितले की,आरोपींचे अश्लील कृत्य आणि त्यांच्या परिसरात झालेल्या गोंधळामुळे दररोज महिला घाबरत होत्या..
राज्य मध्ये समोर येत असलेले गुन्हे बघता पोलीस उप आयुक्त स्मिता पाटील यांनी देखील समता नगर पोलीस ठाण्यामध्ये तळ ठोकून होत्या.आरोपी मुस्लिम असल्याने आणि पीडित हिंदू असल्याने विभागामध्ये तणावपूर्ण वातावरण शांत करण्यामध्ये पोलीस उपायुक्त स्मिता पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण राणे यांना यश आले आहे. सदर घटना विभागामध्ये वाऱ्यासारखी पसरल्याने विविध हिंदू संघटना चे पदाधिकारी समता नगर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये गोळा होत होते.
परंतु पोलीस उपायुक्त स्मिता पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण राणे यांनी योग्यवेळी योग्य भूमिका घेतल्याने विभागांमध्ये कुठल्याही अनुचित प्रकार घडला नाही.
0 Comments