Header Ads Widget

Responsive Advertisement

Union Minister Piyush Goyal| यांची वचनपुर्ती, बोरिवली येथून कोकण साठी रेल्वे आज पासून सुरू..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Union Minister Piyush Goyal| यांची वचनपुर्ती, बोरिवली येथून कोकण साठी रेल्वे आज पासून सुरू..!


 निवडणुकीत दिलेल्या आश्वासन गणपती उत्सव पूर्वी च पूर्ण



मुंबई,29 ऑगस्ट 2024:

 *केंद्रीय वाणिज्य मंत्री खासदार श्री पीयूष गोयल* यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कोंकण वासियांसाठी बोरिवलीतून कोंकण साठी सुटणाऱ्या गाड्यांचे वचन दिले होते. वर्षानुवर्ष ही मागणी कोकणवासीयांनी सरकार कडे केली होती. 

केंद्रीय मंत्री खा.पीयूष गोयल यांनी निवडून आल्या नंतर या मागणी वर लगेच निर्णय घेतले. 

 आज 29 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी दुपारी 12.50 वा.* बोरीवली वरुन सुटणार्‍या कोकण रेल्वेच्या उद्घाटन सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.

उत्तर मुंबई खासदार केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री पीयूष जी गोयल,केंद्रीय रेल्वे व माहिती प्रसारण मंत्री श्री अश्विनी वैष्णव (आभासी प्रक्रियेने उपस्थिती),मुंबई भाजप अध्यक्ष आ. ऍड.आशिष शेलार,माजी खा.गोपाळ शेट्टी, सर्व आमदार प्रवीण भाऊ दरेकर, सौ.मनीषा चौधरी, अतुल भातखळकर, योगेश सागर, सुनील राणे, प्रकाश सुर्वे, वरिष्ठ नेते भाई गिरकर, रेल्वे चे सर्व अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते आणि या सर्वांचे भाषण झाले.

यावेळी बोरिवलीतून कोकणसाठी सुटणाऱ्या पहिली गाडीचे हिरव्या झेंडा दाखवून उद्घाटन करून गाडी रवाना करण्यात आली.

या वेळी आभासी उपस्थितीत रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या भाषणात मुंबई रेल्वे साठी केंद्रातून केलेल्या तरतुदींचे विषय  मांडले. उत्तर मुंबई खासदार म्हणून केंद्रीय मंत्री श्री पीयूष गोयल यांनी सांगितले की 170  वर्षात पहिल्यांदा आज बोरिवलितून ट्रेन सुटणार आहे आणि ही गाडी वसई पनवेल येथून कोंकण पर्यंत जाणार आहे. यासाठी श्री  गोयल यांनी आपले केंद्रात सहकारी श्री वैष्णव जी यांचे धन्यवाद मानले.

बोरीवली स्थानक पूर्व येथे मोठ्या संख्ये ने नागरिक आणि विशेष कोकणवासी यांनी उपस्थित राहून पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी जी,केंद्रीय मंत्री श्री पीयूष गोयल जी, आणि रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांचे अभिनंदन आणि धन्यवाद केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post a Comment

0 Comments