रहिवाशी भागात अनधिकृत पने मोबाईल टॉवर नागरिकाच्या जीवाशी अबू बकर टिंबर मार्ट चे मालक "जाफर शेख" खेळत आहे.
मुंबई प्रतिनिधी:-
आर साउथ मनपा हद्दीमधील कांदिवली पूर्व दामू नगर, भीम नगर या ठिकाणी पोयसर नाल्याच्या लगत इन्द्रजी मार्केट येथे नाल्याला लागूनच g+१ कमर्शियल गाळ्याच्या अनधिकृत धोकादायक बांधकाम "अबू बकर टिंबर मार्ट अँड लाईन डेपो एम.एस.चे मालक जाफर शेख यांनी ,इंदिराजी मार्केट पोयसर नाल्यालगत या ठिकाणी g+1 अनधिकृत धोकादायक बांधकाम निर्माण केले असून सदर अनधिकृत बांधकाम त्वरित निष्काशीत करून संबंधित व्यक्तीवर एमआरटीपी कायद्यांतर्गत कारवाई करावी अश्याची मागणी विविध पक्ष,संघटना व सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
त्याच प्रमाणे बखार मालकाने अनधिकृत धोकादायक जी प्लस वन कमर्शियल गळ्याचे अनधिकृत धोकादायक बांधकाम निर्माण कार्य केलेले असून त्याच बरोबर अनधिकृत बांधकाम स्थळीच अनधिकृत पने रहिवाशी भागात रहिवाश्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम बखार मालक जाफर शेख करत आहे.त्याच ठिकाणी अनधिकृत पने मोबाईल टॉवर लाऊन स्वतः लाखो रुपये ची माया गोळा करत आहेत,मात्र टॉवर लाऊन रहिवाश्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम "जाफर शेख करत आहे.

या ठिकाणी सदर बांधकाम पोयसर नाल्याच्या अगदी खेटून आहे त्यामुळे या ठिकाणाहून रहिवाशांना रस्त्यातून रहदारी करतात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या अनधिकृत बांधकामा मुळे येथील रहिवाशी त्रस्त झाले आहे.
वारंवार या अनधिकृत बांधकामावर सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे कार्यकर्त्यांनी तक्रारी करून देखील अद्याप या अनधिकृत धोकादायक बांधकामावर मनपाच्या इमारत विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी अद्याप तरी कारवाई केलेली नाही.
त्यामुळे मनपा अधिकारी कर्मचारी यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
नुकताच मुंबईमध्ये मान्सून मध्ये विविध ठिकाणी व याआधी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना घडवून जीवितहानी झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या अनधिकृत बांधकामामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री गृह मुख्यमंत्री यांनी वारंवार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे विविध विभागांना आदेश दिलेले आहेत त्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याचे व अनधिकृत बांधकाम जिथे दिसेल तिथे ताबडतोब कारवाई करण्याच्या आदेश दिलेली आहेत परंतु मुख्यमंत्री यांच्या आदेश मनपाचे अधिकारी,कर्मचारी जुमण्यास तयार नाही असे चिन्ह यामध्ये दिसत आहे.
मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे की अनधिकृत बांधकामे व अवैध धांध्या मध्ये ज्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये घडत आहेत त्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई करण्यात येईल.
त्यामुळे लवकरात लवकर संबंधित व्यक्ती यांच्यावर एमआरटीपी कायद्यांतर्गत कारवाई करून सदर अनधिकृत धोकादायक बांधकाम त्वरित निष्काषित करावे WhatsApp Group Join Now
0 Comments