Header Ads Widget

Responsive Advertisement

Jalna District | प्रमोद फदाट यांचे भर पावसात दुसऱ्यांदा उपोषण,तक्रार का करतो म्हणून तहसील कार्यालयातच केला होता हल्ला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रमोद फदाट यांचे भर पावसात दुसऱ्यांदा उपोषण,तक्रार का करतो म्हणून तहसील कार्यालयातच केला होता हल्ला. 


प्रशासनाचे हेतू पुरस्कर दुर्लक्ष,कारवाई करण्यास टाळाटाळ.



जाफराबाद : प्रतिनिधी 


तालुक्यातील मौजे देऊळगाव देवी येथील गट क्रमांक ३० मधील डांबर प्लांट व क्रेशर मशीन सामाजिक बांधकाम विभाग जाफराबाद यांच्याकडून अहवाल मागून महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे तत्काळ प्रेशर मशीन बंद करण्यात यावी या मागणीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रमोद फदाट हे ४ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसलेले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी भर पावसात प्रमोद फदाट यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. विशेष म्हणजे आठवडा भरापुर्वीच प्रमोद फदाट यांच्यावर भाजपचे नेते एस.आर.एल.कन्ष्ट्रशनच्या मालकांनी नायब तहसीलदार यांच्या कॅबीनमध्येच बेदम मारहाण करून जाफराबाद शहरातून मारत मारत धिंड काढली केली होती. सदरील एस आर एल क्रेशर व डांबर प्लांट हे जाफराबाद चिखली राज्य मार्गापासून पासून ५०० ते ६०० मीटर अंतर तसेच लोकवस्तीपासुन २ किमी अंतरावर क्रशिंग मशीन असल्याचा चुकीचा अहवाल तलाठी व मंडळ अधिकारी यांनी देत महसूल प्रशासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे. मौजे देऊळगाव देवी माहोरा गोपी शिवारातील खदानीतून विनापरवाना केलेले दगड उत्खनन याचे मोजमाप करून सदरील क्रशर मालक यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. मौजे हरपळा खासगाव शिवारातील अवैध्य मुरूम साठा व तालुक्यातील अन्य खदाणीला तारेचे कुंपण करणे अशा मागण्यासाठी वेळोवेळी निवेदने व तक्रार देवूनही प्रशासन काहीच कारवाई करत नाही. याबाबत मी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसील, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, पर्यावरण विभागासह आयुक्त यांना अनेक तक्रारी केलेल्या आहेत तरीही शासनाच्या सर्व नियम थाब्यावर बसवून शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडवनाऱ्याला स्थानिक प्रशासन आर्थिक हितसंबंध जोपासून पाठीशी घालत आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनीही याबाबत प्रमोद फदाट यांनी आमरण उपोषण केले होते. केवळ आश्वासन देवून कोणतीही कारवाई न करता प्रशासन हेतू पुरस्कर दुर्लक्ष करीत आहे. पर्यावरण विभागाने संबधित क्रेशरला नोटीस देवून देखील स्थानिक प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही. त्यामुळे ४ सप्टेंबर पासून प्रमोद फदाट हे तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण करत आहे. या क्रेशर बाबत महसूल विभागाकडून तात्काळ सखोल चौकशी करून कारवाई करावी, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्ते प्रमोद फदाट यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post a Comment

0 Comments