मुंबई-काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज दुपारी मागाठाणेचे शिवसेनेचे आमदार व विभागप्रमुख प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हजारो शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. कांदिवली पूर्व शिवसेना शाखा क्र.२६ समोर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्या जवळ, दामू नगर शेवटचा बस स्टॉप,आकुर्ली रोड येथे ही निदर्शने करण्यात आली.यावेळो आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि त्यांच्या
समर्थकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारले.यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून हा परिसर शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने दाणाणून
सोडला होता.
राहुल गांधी यांनी अमेरिकेत दिलेल्या एका मुलाखतीत आरक्षण संपवण्याची भूमिका मांडली होती.या निमित्याने कॉंग्रेसचा छुपा अजेंडा उघड झाल्याचा आरोप आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी केला.आरक्षण संपवणे ही कॉंग्रेसची सुप्त इच्छा राहुल गांधी यांच्या ओठातून स्पष्ट झाली ती आमची महायुती व आम्ही शिवसैनिक कदापी यशस्वी होवू देणार नाही असा एल्गार आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी केला.
यावेळी आमदार/विभागप्रमुख प्रकाशदादा सुर्वे यांच्या सह लोकसभा संपर्कप्रमुख सचिन म्हात्रे,मागाठाणे प्रमुख अमोल नाईक, महिला मागाठाणे महिला प्रमुख शीलाताई गांगुर्डे, माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, भास्कर खूरसंगे, शिवसैनिक संजय सींगण, सर्व विधानसभा संघटक महिला व पुरुष,उपविभागप्रमुख महिला व पुरुष, शाखाप्रमुख महिला व पुरुष, उपशाखाप्रमुख महिला व पुरुष, गटप्रमुख आणि पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
------------------------------------
WhatsApp Group Join Now
0 Comments