Header Ads Widget

Responsive Advertisement

Mumbai/Mhada Mandal Borivali Division Executive Engineer Dinesh Sridhar Shrestha in the network of ACB

"दिनेश श्रीधर श्रेष्ठ" झाला भ्रष्ट,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच येथे श्रेष्ठ....!


मुंबई म्हाडा मध्ये सापळा रचत भ्रष्ट कार्यकारी अभियंता दिनेश श्रेष्ठच्या मुसक्या आवळल्या.



मुंबई प्रतिनिधी :-

मुंबई मध्ये जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे "घर" गरीब,मध्यमवर्गीय कुटुंब आपल पोट मारून, घरासाठी पाई पाई जमा करून घरासाठी लावून ठेवतात.

आपल्या मुला बाळाच्या इच्छा आकांक्षा मारून पैसा साठून ठेवता असतात.झोपडपट्टी धारकांना घरासाठी पाच पाच वर्ष म्हाडाला फेऱ्या माराव्या लागतात. झोपडपट्टी धारकाचे सर्व कागदपत्र पूर्ण असून देखील कुठल्या ना कुठल्या चुका काढण्यामध्ये हे लोकं पटाईत असतात आणि झोपडपट्टी धरकाकडून मोठ्या रक्कमची मागणी करतात. त्या मुळे गरीब वैतागून शेवटी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे धाव घेतात.

असाच प्रकार म्हाडा मुंबई मंडळातील बोरिवली विभाग मधील कार्यकारी अभियंता दिनेश श्रीधर श्रेष्ठ यांनी देखील केला आहे.

 झोपडपट्टी धारकांना त्रास देण्यास सुरुवात केली,कांदिवली पूर्व येथील रहिवाशी रवि भिकाजी बनसोडे यांना देखील कार्यकारी अभियंता दिनेश श्रेष्ठ यांनी असाच त्रास देण्यास सुरुवात केली होती,शेवटी नाईलाज शेवटी अँटी करप्शन ब्युरो एकच पर्याय शेवटी उरला.



या वेळी निर्भीड सम्राटशी बोलताना रवी बनसोडे सांगतात की म्हाडा किंवा SRA यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, पाच पाच वर्ष एस आर ए किंवा म्हाडा मध्ये गरीब जनता येजा करून अक्षरशः वैतागून जातात.माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एकच मागणी आहे की म्हाडा मध्ये या सर्व कामासाठी एक खिडकी कार्यक्रम राबवावा,जेणे करून जनेतेची ही पायपीट थांबून त्याचे फाईल किंवा त्याचे कामे एका महिन्यामध्ये पूर्ण करण्यासाठीचे आदेश द्यावेत.या मुळे म्हाडा मधील भ्रष्टचार कमी होण्यास मदत होईल.

सविस्तर वृत्त असे की रवि बनसोडे यांच्या काकाने त्यांची झोपडी त्यांना बक्षीस पत्र देऊन त्यांना कायम त्यांच्या नावे केली. सदर झोपडी ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रस्तावित होती. तक्रारदार रवि भिकाजी बनसोडे यांनी भूव्यवस्थापक ,बोरिवली विभाग म्हाडा मुंबई मंडळ कार्यालय बांद्रा या कार्यालय मध्ये अभय योजना अंतर्गत परिशिष्ट २ मध्ये हस्तांतर करण्यासाठी अर्ज केला होता.त्यांच्या बरोबर रवि बनसोडे यांच्या सोबत इतर एकूण १० लोकांनी देखील अर्ज दाखल केले होते.त्यातील चार फाईल पात्र झाल्या.आणि बाकीच्या फाईल चे काम प्रलंबित राहिले.

 सर्व कागदपत्र बरोबर असून सर्व कागद पत्राची पूर्तता करून देखील प्रत्येकी फाईल ६० हजार रुपयांनी एकूण ६ लाख २० हजार रुपये एवढी मागणी केली होती, या चार फाईल पात्र २०२४ मध्ये कुठलाही पैसा न देता पात्र झाल्या त्या वेळी कार्यकारी अभियंता दिनेश श्रेष्ठ त्या पदावर नव्हेत.परंतु दिनेश श्रेष्ठ ह्यांनी जेव्हा पासून बोरिवली विभाग कार्यकारी अभियंता पदभार स्वीकारला तेव्हा पासून नागरिक त्रस्त आहे.

 त्यावर तक्रारदार यांनी वैतागून लाचलूचापत विभागाकडे तक्रार केली त्यावर रवी बनसोडे यांच्या तक्रारीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्वरित ऑक्शन मोड मध्ये आले,आणि सलग दोन दिवस सापळा रचत कारवाई केली.

 दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.० ० वाजेपासून सापळा रचून दिनेश श्रीधर श्रेष्ठ याचा विश्वासू जो म्हाडा मधील सर्व पैशाची व्यवहार सांभाळत होता "संजय मनीलाला त्रिवेदी" हा जो व्यक्ती बघत असतो त्याला कार्यकारी अभियंता दिनेश श्रीधर श्रेष्ठ यांनी पैसे घेण्यास सांगितले होते,संजय मंगीलाला त्रिवेदी याला अँटी करप्शन रेड हॅन्ड पैसे घेताना पकडले,त्या नंतर दुसरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दुसर पथक म्हाडा मध्ये सापळा रचून वाट बघत होते.कार्यकारी अभियंता केव्हा आपल्या दालनात येईल.

जसा कार्यकारी अभियंता दिनेश श्रीधर श्रेष्ठ हा त्यांच्या कॅबिन मध्ये आला आणि काही वेळातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पथक दिनेश श्रीधर श्रेष्ठ यांच्या दालना मध्ये घुसून त्याला अटक केले.जेव्हा कार्यकारी अभियंता दिनेश श्रीधर श्रेष्ठ यांच्या दालनाची झाडाझडती घेतली तेव्हा त्यांच्या दनातील एका कम्प्युटरच्या पीसी मध्ये एक लाख रुपये एवढी रक्कम सापडल्याची खात्रीलायक सूत्राची माहिती आहे.

सूत्रांच्या माहिती नुसार "संजय त्रिवेदी" याला म्हाडा मधून विविध कामाचे ठेके भेटत होते.हे सर्व ठेके तो अनधिकृत पने घेत असत.त्याकडे कामे घेण्यासाठी लायसन देखील नसताना त्याला म्हाडा मधून ठेके भेटत अशी खात्रीलायक सूत्राने माहिती दिली आहे.

आता पुढील तपास चालू आहे.तपासा मध्ये अनेक गौप्यस्फोट

 होण्याची शक्यता आहे.

शासकीय अधिकारी यांना कायद्याचा धाक राहिला नाही.जेव्हा कायदाची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळते तेव्हा त्यांना कळते.नसता हे अधिकारी सर्वसामान्य जनतेला एकदम खालच्या पातळीची वागणूक देतात.

रवी बनसोडे यांनी केलेल्या सहासामुळे आणि म्हाडाच्या वर्ग १ च्या अधिकारी याला कायदा सर्वांसाठी असतो हे दाखून दिले आहे.त्याच बोरोबर म्हाडाचा अधिकारी कार्यकारी अभियंता दिनेश श्रीधर श्रेष्ठ यांच्यावर झालेल्या कारवाईने म्हाडा मधील इतर अधिकाऱ्यांना हा एक संदेश आहे.येणाऱ्या काळात आता म्हाडा मधील कर्मचारी अधिकारी हे इमानदारीने आपले कर्तव्य पार पाडेल,या कारवाईने म्हाडा मधील सर्व कर्मचारी अधिकाराचे धाबे दणाणले आहेत.

खात्रीलायक सूत्रांच्या मिळालेल्या माहितनुसार म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सर्व कर्मचारी व अधिकारी यांना आदेश दिले आहेत की जो कोणी येईल त्याचे काम त्वरित पूर्ण करावे,कोणाचे कॉल घ्याचे नाही त्यांना कार्यालयांमध्ये प्रतेक्ष बोलून त्याचे काम किंवा त्यांच्या फाईल पूर्ण करावे.

या कारवाई मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनेश श्रीधर श्रेष्ठ,संजय मंगीलाल त्रिवेदी (खासगी इसम) आणि एक रिक्षा चालक "राजकुमार हिरालाल यादव (खासगी इसम) असे एकूण तिघांना अटक केली आहे.



रवि बनसोडे यांनी केलेल्या धडाकेबाज कार्यामुळे समाज माध्यम व विविध माध्यमातून त्यांच्यावरती अभिनंदांचा वर्षाव होत आहे.

या वेळी धडक  कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी रवि बनसोडे यांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरी मुळे त्यांना शाल देऊ रवि बनसोडे यांचे स्वागत देखील केले.


Post a Comment

0 Comments