अनधिकृत एसी कोटींग कंपनीला लागलेल्या आगी नंतर पुन्हा अनधिकृत पने धोकादायक बांधकाम सुरू....
कंपनी विरोधात स्थानिकांचा विरोधा नंतर देखील काम सुरू आर साऊथ मनपा इमारत विभाग करते काय?
मुंबई प्रतिनिधी:- दिनांक १४/०२/२०२५ रोजी साधारणता साडेसहा वाजेच्या सुमारास आझाद वाडी सिंग इस्टेट रोड क्रमांक ५,दामू नगर वॉर्ड क्रमांक २६ कांदिवली पूर्व मुंबई.येथे अनधिकृत पने रहिवाशी भागामध्ये एसी कोटींग पावडरच्या कारखान्याला आग लागली होती.
या आगी मध्ये कारखाना पूर्ण पने जळून खाक झाला होता. या कारखान्याच्या विरोधात स्थानिक रहिवाशी यांनी १४/०१/२०१९ मध्ये आर साऊथ मनपा आणि स्थानिक पोलीस ठाणे मध्ये लेखी तक्रार दिली होती,स्थानिकांनी तक्रार नोंद करून देखील आर साऊथ मनपा इमारत आणि कारखाने विभागाने कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही.
स्थानिकांच्या तक्रारीची दखल त्याच वेळी मनपाचे अधिकारी यांनी घेतली असती तर ही वेळ आली नसती.
आग लागून साधारणतः एक महिना उलटून झाला असतानाच आता पुन्हा एसी कोटिग कंपनी सुरू कण्यासाठी कारखानदार नदीम अब्दुल करीम खलिल यांनी पुन्हा अनधिकृत धोकादायक बांधकाम सुरू केले आहे.
येवढे होऊन देखील अद्याप सदर कारखानदार यांच्यावर कुठलीच कारवाई झाल्याचे आढळून आले नाही.
सदर अनधिकृत बांधकाम त्वरित निष्कासित करण्याची मागणी स्थानिक रहिवाशी करत आहे.स्थानिक रहिवाशी यांच्या मागणीला मनपा इमारत विभाग प्रतिसाद देणार का असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे .

0 Comments