बृहन्मुंबई शिक्षक संघाने डावरे सरांच्या हस्ते मेडल प्रमाणपत्र व टॅब देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांचे केले कौतुक
मुंबई प्रतिनिधी:-
बृहन्मुंबई शिक्षक संघाच्या वतीने विभागातील मार्च 25 मधील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दहावी हे वर्ष सर्व विद्यार्थ्यांचा आयुष्याला कलाटणी देणाऱ्या असतात यावेळी त्या विद्यार्थ्यांनी तिथे मेहनत घेतलेली असते त्या मेहनतीचं कौतुक व्हावं याकरिता बृहन्मुंबई शिक्षक संघाच्या वतीने सत्कार गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता मोठ्या संख्येवरती विभागातील शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला बृहन्मुंबई शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संजय डावरे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे माननीय योगेश मिश्रा एडिटर इन चीफ बॉलीवूड डाऊन मॅक्झिन, फेजर एज्युकेशनचे विकास झा, सामाजिक कार्यकर्ते राज विश्वकर्मा स्कूल संस्थापक शिवपूजन यादव, वीरेंद्र साळवी आर पी यादव अतिथी म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शालेय वस्तू , टॅब ,मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धीरेंद्र विश्वकर्मा अविनाश पाटील अशोक यादव व सतीश सर , रोशन व इतर यांनी मेहनत घेतली.


0 Comments