Header Ads Widget

Responsive Advertisement

वेणी येथील सामाजिक प्रश्न सामंजस्याने सोडवू – आमदार सिद्धार्थ खरात यांची ग्वाही

वेणी येथील सामाजिक प्रश्न सामंजस्याने सोडवू – आमदार सिद्धार्थ खरात यांची ग्वाही

*तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजांच्या स्वतंत्र बैठकांमधून दिलासा; ग्रामस्थांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद*




मेहकर दि २३ :-

मेहकर पो.स्टे. अंतर्गत लोणार तालुक्यातील वेणी गावात झेंड्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या सामाजिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी वेणी येथे दि २२ ला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. दोन्ही समाजांच्या स्वतंत्र बैठकांचे आयोजन करून त्यांनी हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचे आवाहन केले.

"वेणी गावाचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, गावात तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टींपासून दोन्ही समाजांनी दूर राहावे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शांती व सौहार्दाचे वातावरण राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे," असे आवाहन आमदार खरात यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले.

या वेळी त्यांनी गावातील दोन्ही समाजाच्या महत्त्वाच्या नागरिकांशी चर्चा करून लवकरच सामूहिक बैठक घेण्याचे आश्वासन दिले, जेणेकरून शाश्वत आणि सर्वमान्य मार्ग निघू शकेल.

या बैठकीस मेहकरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, तहसीलदार भुषण पाटील,मेहकर पोलीस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार, वेणी गावचे सरपंच मनोज तांबिले,उपसरपंच शेषराव जाधव, पोलिस पाटील अर्जुन जाधव, राजू गायकवाड,मेहकरचे शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे, युवा सेना तालुका अधिकारी आकाश घोडे , बाजार समिती संचालक तेजराव घायाळ, 

 गोपाल खोतकर, माणिक जावळे , गजानन काकडे, प्रल्हाद देवकर, संतोष खोतकर, विठ्ठल शेवाळे ,प्रवीण देशमुख, अमोल काळे, राजकुमार दलवे, अशोक हरदाळकर ऋषिकेश काळे, रवि मोरे,सदानंद पाटील तेजनकर, बाळाभाऊ पवार, रंगनाथ जाधव, दौलतराव शेवाळे, राम वीर, मोहन शिंदे, स्वप्निल हाडे ,जीवन घायाळ,  विठ्ठल साखरे ,प्रमोद देशमुख,देविदास जाधव,निंबाजी जाधव, परमेश्वर जाधव,भिमराव कटारे, गजानन वाघमारे,शोभाबाई जाधव,सविता सरदार,अनिता सरदार, जिवन कटारे,दादाराव जाधव,सुनिल इंगळे,समाधान वाघमारे,दगडू जाधव, सरदार साहेब,कैलास गवई, गौतम वाघमारे सह गावकरी उपस्थित होते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

ग्रामस्थांनी या दोन्ही बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सध्या गावात "तणावपूर्ण शांतता" असून, काही बाहेरगावच्या व्यक्तींनी तणाव चिघळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी "गावात सामाजिक सलोखा टिकवणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. कोणत्याही जातीय तेढाला बळी न पडता, एकसंघपणे शांतता राखा," असे स्पष्टपणे सांगितले.

Post a Comment

0 Comments