Header Ads Widget

Responsive Advertisement

आंबेडकरी चळवळीचे युवा नेते विकास लहाने यांचे आंबेडकरी समाज हितासाठी विविध मागण्यासाठी जालना जिल्हा अधिकारी कार्यालय समोर अमरण उपोषण...!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आंबेडकरी चळवळीचे युवा नेते विकास लहाने यांचे आंबेडकरी समाज हितासाठी विविध मागण्यासाठी जालना जिल्हा अधिकारी कार्यालय समोर अमरण उपोषण...!


आंबेडकरी समाज आणि विविध पक्ष, संघटनाचा वाढता पाठिंबा,मात्र जिल्हाधिकारी यांचे झोपेचे सोंग,आंबेडकरी समाजामध्ये रोष 

जालना प्रतिनिधी:- आंबेडकरी चळवळीचे युवा नेतृत्व विकास लहाने यांचे आंबेडकरी समाज हितासाठी आमरण उपोषण जालना जिल्हाधिकारी कार्यालय समोर सुरू आहे.

शासानी आंबेडकरी समाजाची जी हेळसांड चालवली आहे त्या विरोधात हे उपोषण या उपोषणाला विविध पक्ष,संघटनांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

आंबेडकरी समाज शेकडो वर्षापासून विविध अत्याचार सोसत आला आहे. या अत्याचार विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बंड करून दलितांना जगण्याचा अधिकार मिळून दिला.भारताचे संविधान लिहून संपूर्ण भारतीयाना आपले हक्क अधिकार मिळून दिले.त्याच हक्क अधिकार हिरावून घेण्याचे षड्यंत्र काही अदृष्य शक्ती, हे सरकार करत आहेत.



अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, व इतर जाती जमाती साठी आपला उदार निर्वाह करण्यासाठी पूर्वी सरकार वंचित घटकातील कुटुंबाला आधार म्हणून जमानीचे पट्टे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी देत असत. परंतु आता ज्या ज्या कल्याणकारी योजना दलीत वंचित घटकांसाठी राबवल्या जात असे त्या पूर्णतः बंद करण्याचे काम या जातीवादी सरकार करत आहे. असे विकास लहाने यांचे मत आहे.


 विकास लहाने यांच्या उपोषणाचे ठळक मागण्या .

१) शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी सन २०२३ ते २४ पर्यंत देण्याबाबत. 

२) गायरान धारक शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या शेतजमीन  सातबारे उताऱ्यावर नोंद घेण्याबाबत.

३) रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रहिवाशांना कमीत कमी पाच लाखापर्यंत अनुदान देण्यात यावी. 

४) शहरी झोपडपट्टी मधील रहिवाशांना रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजने मध्ये जी "पीआर कार्ड" ची अट आहे,ती तत्काळ रद्द करण्यात यावी व त्यांची अनुदान पाच लाख रु करण्यात यावी.

५) महात्मा फुले विकास महामंडळ अंतर्गत उमेदवारांना ५० लाखा रू पर्यंत अनुदान देण्यात यावे.

६) नागपूर येथील दीक्षाभूमीवर झालेल्या आंदोलनामधील भीमसैनिकावरील जे गुन्हे दखल झाले आहेत ते तत्काळ रद्द करावे.

७) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनाची रक्कम पाच लाखापर्यंत वाढून द्यावी आणि पाचशे मीटर अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी ही आट त्वरित रद्द करण्यात यावी.

८) जालना येथे मोतीबाग तलाव मधील प्रलंबित तथागत भगवान गौतम बुद्धाचे पूर्ण कृती मूर्ती तत्काळ स्थापन करण्यात यावी. 

९) केजी ते पीजी पर्यंत संपूर्ण शिक्षण मोफत मिळाव.

१०) भीमा कोरेगाव प्रकरणातील जी दंगली घडली त्या मध्ये भीमसैनिकावरील संपूर्ण खोटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे.

११) समाज कल्याण विभागाचा निधी इतरत्र नवळवता केवळ एस सी आणि एस टी साठीच वापरावा

१२) मागासवर्गीय औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थेच्या प्रस्तावास तत्त्व मान्यता देण्यात यावी.

 केंद्र शासनाची संबंधित मागणी:-  एससी एसटी वर्गीकरण व क्रिमिनियाल अट रद्द करावी.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विमानतळाला तथागत भगवान गौतम बुद्ध असे नामकरण करण्यात यावे.

दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण चैत्यभूमी असे करावे.

वरील सर्व मागण्या बुद्धिस्ट आंबेडकरी समाजाच्या वतीने विकास लहाने हे दिनांक १९/०९/२०२४ पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. 

बुद्धिस्ट आंबेडकरी समाज वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्यांनी मागणी केली आहे.

*पंढरपूर येथील धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समिती स्थापन केली आहे.

*मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाच्या आंदोलनासाठी समिती स्थापन केलेली आहे.

*दीपक रननवरे यांच्या ब्राह्मण समाजाच्या मागण्या साठी समिती स्थापन केली. 

*लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्याही बाबतीत समिती स्थापन केली. 

*रविकांत तुपकर यांचीही समिती स्थापन केली. 

त्याच धर्तीवर बुद्धिस्ट आंबेडकरी समाजाच्या न्यायिक मागण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती तत्काळ स्थापन करावी. 

नसता आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

इत्यादी मागण्या साठी आंबेडकरी  युवा नेते विकास लहाने हे आमरण उपोषणाला बसले आहेत.परंतु त्यांच्या मागण्यांकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहेत.

उपोषणाला १० दिवस होत आहेत.विकास लहाने यांची प्रकृती खालावली असल्याने आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ह्या आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास मोठा उद्रेक  होण्याचे चिन्ह दिसत आहे.


आंबेडकरी समाजातून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.लवकरात लवकर विकास लहाने यांचे उपोषणाच्या मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण सोडावे.

आंबेडकरी समाजाच्या वतीने उद्या दिनांक २८/०९/२०२४ सामाजिक न्याय भवन येथे संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या पदाधिकाऱ्याची बैठक होणार आहेत या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे.या बैठकीत मध्ये मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित राहण्याचे आवाहन कैलास रत्नपारखे यांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post a Comment

0 Comments