आमित शहांच्या मार्गदर्शनाने कार्यकर्ते चार्ज,मुंबईमधील सर्व जागा महायुतीच जिंकणार-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा विश्वास
मुंबई प्रतिनिधी:- अमित शहा हे एक ऊर्जास्रोत आहेत. त्यांनी स्वतः आज मुंबईत येऊन कार्यकर्त्यांना ज्या उंचीचे मार्गदर्शन केलेय त्यावरून मुंबईत भाजपाचा कार्यकर्ता प्रचंड चार्ज झालाय. लोकसभेत आम्हाला जागा कमी मिळाल्या त्याचा पूर्ण वचपा भाजपाचे कार्यकर्ते काढतील आणि मुंबईच्या सर्व जागा महायुतीच्या जिंकतील असा विश्वास भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबई दौऱ्यावर होते. शहा यांच्या उपस्थितीत दादर येथील योगी सभागृहात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर म्हणाले कि, अमित शहा यांनी येणे आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे म्हणजे सगळ्या गोष्टींना मूठमाती देऊन राग, लोभ, नाराजी पुन्हा ताकदीने कामाला लागणे हा एक परिपाठ आहे. म्हणून आशिष शेलार यांनी शक्ती कार्यकर्त्यांची आणि प्रचिती आत्मविश्वासाची हा संदेश आज मुंबईत दिला. कार्यकर्ता ही भाजपाची शक्ती आहे आणि आत्मविश्वास देण्याचे काम अमित शहा ज्यांच्याकडे संघटन कुशलता म्हणून संपूर्ण देश पाहतो, आत्मविश्वास काय असू शकतो हे अमित शहा यांनी देशाच्या संघटनात्मक पक्षाच्या आणि निवडणुकीच्या बाबतीत कृतीतून दाखवून दिलेय. त्यांनी स्वतः आज इथे येऊन कार्यकर्त्यांना ज्या उंचीचे मार्गदर्शन केलेय त्यावरून मुंबईत भाजपाचा कार्यकर्ता प्रचंड चार्ज झालाय. लोकसभेत आम्हाला जागा कमी मिळाल्या त्याचा पूर्ण वचपा भाजपाचे कार्यकर्ते काढतील आणि मुंबईच्या सर्व जागा महायुतीच्या जिंकतील असा आत्मविश्वास घेऊन आमचा कार्यकर्ता अमित शहा यांच्या संवाद मेळाव्यातून गेला असल्याचे दरेकरांनी म्हटले.
00000

0 Comments