राहुल गांधीने आणि प्रकाश आंबेडकरांचा 31 सेकंद फोनवर संवाद!
मुंबई : आज सकाळी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांना फोन केला होता. या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये 31 सेकंद संवाद झाल्याची माहिती मिळाली आहे. या दरम्यान राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांची माफी मागितली कारण, काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर आयसीयूमध्ये 5 दिवस भरती होते, त्या दरम्यान राहुल गांधीच्या काही समर्थकांनी समाज माध्यमांवर प्रकाश आंबेडकर यांना शिव्या दिल्या होत्या. काहींनी तर लवकरात लवकर मरावे अशाही कामना केल्या होत्या.
प्रकाश आंबेडकर यांच्या जवळच्या सहयोगीने सांगितले की, या दरम्यान राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी तब्बेत चांगली असून सध्या ते निवडणुकीचा प्रचार करत असल्याचे त्यांना सांगितले.
याच सहयोगीने सांगितले की, राहुल गांधीने सांगितले की, पुढील वर्षी जानेवारीत ते महाराष्ट्रात येतील तेव्हा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतील.
" देशभरातील नेते, विरोधी पक्षातील नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना भेटून प्रकुतीची विचारपूस करून गेल्यावर आता राहुल गांधी यांना सुचले का?" अशीही प्रतिक्रियाही एका कार्यकर्त्याने दिली.
प्रकाश आंबेडकर यांच्या सभा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत. आणि त्यांनी सर्व वंचित घटकातील लोकांना उमेदवारी दिली आहे. येत्या 20 तारखेला राज्यात मतदान होणार आहे आणि 23 ला निकाल लागणार आहे.
--------

0 Comments