Header Ads Widget

Responsive Advertisement

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यास्वाक्षरीने EVM हटाव मोहीमेला सूर्वात,राज्यभर स्वाक्षरी मोहिमेद्वारे जनआंदोलन

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यास्वाक्षरीने EVM हटाव मोहीमेला सूर्वात,राज्यभर स्वाक्षरी मोहिमेद्वारे जनआंदोलन



मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या EVM विरोधात स्वाक्षरी मोहीमेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वाक्षरी करत सुरुवात केली. त्यांनतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात EVM विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. EVM च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. EVM च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. 

---

Post a Comment

0 Comments