परभणी प्रकरणी बाळासाहेब आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांसह पोलीस महानिरीक्षकांना फोन
आंबेडकरी वस्त्यांमधील कोंबिग ऑपरेशन तातडीने थांबवा
परभणी : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी दोनवेळा फोनवर संपर्क साधला आहे. तसेच आंबेडकरी वस्त्यांमध्ये सुरू असलेले कोंबिग ऑपरेशन तातडीने थांबविण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व समाजकंटकांना अटक करा, अन्यथा तर पुढील दिशा ठरवली जाईल असा इशारा ॲड. आंबेडकर यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, परभणीप्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले आहे. दलितांच्या सुरू असलेल्या अटका आणि दलित वस्तीवर सुरू असलेले कोम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवावे, अशी मागणी केली आहे. तसेच आंबेडकर यांनी सर्व दलित आणि संविधानवादी जनतेला शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक झाली नाही, तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू असा इशाराही आंबेडकर यांनी दिला आहे.
----

0 Comments