Header Ads Widget

Responsive Advertisement

सिंचन विभगाची,डॉ.बाबसाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मधील जाचक अटी मुळे मुळे अनुसूचित जाती व जमाती त्रस्त...

सिंचन विभगाची,डॉ.बाबसाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मधील जाचक अटी मुळे मुळे अनुसूचित जाती व जमाती त्रस्त...


सेमिक्रीटिकल अट रद्द करण्यासाथी तहसिलदार यांना बालू म्हस्के यांनी दिले निवेदन.....



सिंदखेड राजा 03 :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत अनुसूचित जाती/ जमातींच्या च्या लाभार्थ्यांना अनेक योजना राबविल्या जातात परंतु एकच योजनेला भूजल सर्वेक्षण विभाग बुलढाणा यांनी समिक्रीटिकल मध्ये टाकून जाणून बुजून अनुसूचित जाती/जमातींच्या लाभार्थ्यांना लाभा पासून वंचीत केले आहे. दुसरीकडे जिल्हापरिषेच्या सामाईक क्षेत्रातील सिंचन विहिरींना अश्या प्रकारच्या जाचक अटी मधून वगळण्यात आले आहे. या मुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत मिळणाऱ्या सिंचन विहिरी सन. 2019 पासून बंदच आहेत तर शासनाच्या पोर्टल वर आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत अनुसूचित जातीं/जमातींच्या लाभार्थ्यांना अर्ज करता येतो. परंतु विहीर मंजूर झाल्यानंतर भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या विभागाकडून ती रद्द करण्यात येते यावर अनुसूचित जाती/जमातीच्या समजा मध्ये नाराजीचा सुर दिसून येत आहे.

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील सिंदखेडराजा नगर परिषद क्षेत्रासह सिंदखेड राजा मंडळ,किनगांव राजा मंडळातील सेमिकृतिकलची जाचक अट सिथील करण्यासाठी बालु जगननाथ म्हस्के यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर शेती स्वावलंबन योजने अंतर्गत (कृषी विभाग) अनुसुचीत जातीतील घटकातील पात्र शेतकर्याना लाभाचे स्वरूप नवीन सिंचन विहीर, विहीर दुरुस्ती, बैलजोडी, स्पिंकलर इ योजनेचा लाभ दिला जातो.माहे ऑगष्ट २०२४ मध्ये असे दिसते की, सिंदखेडराजा न.प हदीसह व किनगावगांव राजा मंडळ हे अतिवृष्टीमध्ये शासनाच्या सर्वेनुसार आलेले आहे. परंतु त्या ठिकाणी भूजल सर्वेक्षण विभाग बुलडाणा यांनी या मंडळातील मोजके काही गावे वगळून सर्वच गावे सेमिक्रीटिकल मध्ये टाकली आहेत. या संदर्भात सिंदखेडराजा सह किनगाव राजा हे दोन्ही मंडळातील सेमिक्रिटीकलची अट सिथील करण्यात यावी असे तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. साप्ताहिक निर्भीड सम्राटशी बोलताना बालू म्हस्के यांनी सांगितले आहे की येणाऱ्या विधानसभा अधिवेशन मध्ये सिंदखेड राजा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायांदे यांना निवेदन देऊन सदर विषय येणाऱ्या अधिवेशनात उपस्थित करण्याची विनंती करणार आहे.सदर निवेदन देताना बालू म्हस्के,किशोर पाडमुख, ओमप्रकाश राठोड, हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments