Header Ads Widget

Responsive Advertisement

वांद्रे परिसरातील नागरिकांना परवडणाऱया दरात

वांद्रे परिसरातील नागरिकांना परवडणाऱया दरात

अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार – पालकमंत्री श्री. आशिष शेलार

 

    • सुपरस्पेशालिटी सुविधांनी युक्त के. बी. भाभा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण संपन्न

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे (पश्चिम) येथील खुरशेदजी बेहरामजी भाभा सर्वसाधारण रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे लोकार्पण माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते आज (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५) करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय उपचार सहज उपलब्ध होतील. यापूर्वीविविध उपचारांसाठी रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जात असे. मात्रआता सुपरस्पेशालिटी सुविधांनी युक्त आरोग्यसेवा के. बी. भाभा रुग्णालयातच उपलब्ध होणार असल्याने ही आवश्यकता राहणार नाहीअसे प्रतिपादन पालकमंत्री श्री. आशिष शेलार यांनी यावेळी केले.


 

या लोकार्पण सोहळ्याला उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱहाडेउपायुक्त (परिमंडळ ३) श्री. विश्वास मोटेमुख्य वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालये) श्री. चंद्रकांत पवारएच-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त श्री. विनायक विसपुते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. आशिष शेलार पुढे म्हणाले, "वांद्रे परिसरात पंचतारांकित रुग्णालये असली तरी सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱया दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका याच उद्देशाने हे कार्य करत आहे. भाभा रुग्णालयात उपचार घेणाऱया नागरिकांसाठी न्युरोलॉजीन्युरोसर्जरीकार्डिओलॉजीकॅथलॅबडायलिसिस सेंटर आणि अत्याधुनिक उपचार विभाग अशा अनेक सेवा उपलब्ध आहेत. तसेच सीटी स्कॅनएमआरआय यांसारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. तसेचरुग्णालयातील स्वच्छता राखणे ही प्रशासनाइतकीच नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी आहेअसेही श्री. शेलार यांनी नमूद केले.

 

८ लाख लोकसंख्येला लाभः

के. बी. भाभा रुग्णालयाच्या भौगोलिक स्थानामुळे वांद्रे (पूर्व आणि पश्चिम)खार (पूर्व आणि पश्चिम)सांताक्रूझ (पूर्व)कुर्ला (पश्चिम) या भागातील रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. अंदाजे ८ लाख लोकसंख्येला या रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली जाते.

दररोज २,००० ते २,२०० रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जाते. पश्चिम उपनगरातील नागरिकांना जलद आणि उत्तम सेवा देण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या इमारतीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

 

रुग्णालयाचा विस्तार  दोन टप्प्यात कामः

रुग्णालयाच्या विस्ताराचा पहिला टप्पा १२ मजली विस्तारित इमारतीसह पूर्ण झाला आहे. ही इमारत नागरी आरोग्य सेवांसाठी समर्पित करण्यात आली आहे. दुसऱया टप्प्यात मूळ इमारतीची डागडुजी आणि देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. दोन्ही इमारतींमध्ये मिळून ४९७ रुग्णशय्या उपलब्ध आहेतज्यामध्ये अतिदक्षता (आयसीयू) आणि विविध विभागांचे विशेष कक्ष यांचा समावेश आहे. तसेचअत्याधुनिक मॉड्युलर तंत्रज्ञानावर आधारित १४ शस्त्रक्रिया विभाग आगामी काळात संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहेत.

***

Post a Comment

0 Comments