समता नगर पोलीस ठाणे वतीने बेटी बचाव, बेटी पढाव जनजागृती रॅलिची आयोजन
महिला पोलीस कर्मचारी आणि विद्यार्थिनीचा सुपूर्त प्रतिसाद.
मुंबई प्रतिनिधी :-
समता नागर पोलीस ठाणे वतीने मुंबई पोलिसांचा उपक्रम बेटी बचाव,बेटी पढाव कार्यक्रम परिमंडळ १२ चे पोलीस उपआयुक्त श्रीमती स्मिता पाटील यांच्या आयोजनाखाली समता नगर पोलीस ठाणे येथे घेण्यात आला.
या वेळी मोठ्या प्रमाणात महिला पोलीस व विद्यार्थिनी यांनी या मध्ये सहभाग घेतला.
या वेळी महिला पोलिस आणि विद्यार्थिनी यांनी रॅली मध्ये सहभाग घेऊन बेटी बचाव बेटी पढ़ाव,मुलगी शिकली प्रगती झाली.अश्या अश्याच्या घोषणे परिसर दुमदुमला.
रॅलीची सुरुवात वनराई पोलीस ठाणे येथून करता वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे समता नगर पोलीस ठाणे ते परिमंडळ १२ पोलीस उपायुक्त कार्यालय दहिसर येथे रॅलीची सांगता झाली.
या वेळी प्रमुख उपस्थिती श्रीमती स्मिता पाटिल (परिमंडळ १२ पोलीस उपायुक्त),समता नगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील,श्रीमती चक्रवर्ती मॅडम ठाकूर कॉलेज सायन्स अँड कॉमर्स प्रिन्सिपल तसेच ठाकूर कॉलेज चे विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते.

0 Comments