Buldhana|मातृतीर्थ सिंदखेडराजा हद्दी मधील वर्दडी ब्रु येथील महिला सरपंच यांना ग्राम सभेत जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी ....
विषयाचे गांभीर्य ओळखून किनगाव राजा पोलिसांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत चौघा विरोधात गुन्हा नोंद केला.
सिंदखेड राजा प्रतिनिधी:-
पुरोगामी महारष्ट्र मध्ये अजून जातीय तिरस्कार अजून काही गेलेला दिसत नाही.मातृतीर्थ सिंदखेडराजा हद्दी मधील वर्दडी बु येथील महिला सरपंच सौ पुष्पा मधुकर इंकर यांना या प्रसंगाना तोंड द्यावे लागले.
ग्राम पंचायत मध्ये ग्राम सभा सुरू असताना स्थानिक रहिवाशी आरोपी (१) योगेश पांडुरंग पालवे (२) विनोद भास्कर पालवे (३) कल्याण अशोक पालवे यांनी पाण्यासाठी नळ कनेक्शन द्यावे असे बोलून गोंधळ सुरू केला त्या वेळी महिला सरपंच सौ पुष्पा मधुकर इंकर यांनी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये रीतसर अर्ज द्या त्या नंतर ग्राम पंचायत तुम्हाला नळाचे कनेक्शन ताबडतोप द्याला तयार आहे.
यावर मनात जातीय द्वेष घुसमटत आल्याने योगेश पांडुरंग पालवे यांनी महिला सरपंच सौ पुष्पा मधुकर इंकर यांना तुझी या सरपंच पदाच्या खुर्चीवर बसण्याची आवकात आहे का? माहाऱ्या, धेड्या हो असे जातीवाचक शिवीगाळ केली.
योगेश पांडुरंग पालवे यांचे बघून विनोद भास्कर पालवे यांनी देखील त्याच शब्दात (तुझी लायकी तरी आहे का या खुर्चीवर बसण्याची महाऱ्या ढेड्या हो) आणि अविनाश पांडुरंग पालवे यांनी तू ग्राम पंचायतच्या बाहेर ये तुला दाखवतो अशे म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
सदर ग्रामपंचायतीची ग्राम सभा ही ग्राम पंचायत मध्ये होत होती,या वेळी ग्रामपंचायत सचिव रामदास मेहेत्रे,ग्रामपंचायत उपसरपंच सै.उषा ज्ञानेश्वर चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य सौ.आशमती सुधाकर साळवे,मंगल पंडीत काकडे,रवींद्र उद्धवराव नागरे, राजेश अशोक कंगंले, सौ नंदा सुरेश काकडे, तसेच गावातील नागरीक यांच्या समक्ष सदर
लोकांनी जातिवाचाक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
गावाची महिला सरपंच असून देखील जर जाती मुळे अपमानित होवे लागत असेल तर नक्कीच या ठिकाणी जातीय द्वेष किती आहे.यावरून स्पष्ट दिसत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी घेतलेली भूमिका विशेष म्हणावी लागेल पोलिसांच्या सतर्कतेमुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली असे म्हण्यास काही हरकत नाही.
सदर प्रकारची माहिती जर तालुक्यातील लोकांना लागली लागली असती तर नक्कीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता.
पोलिसांनी सदर गुन्ह्यामध्ये आरोपी विरोधात दाखले केले कलम बी एन एस २०२३ कलम ३५२, ३५१ (२), ३(५) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ कलम ३(१)(r),३(२) (va) कलमा अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

0 Comments