जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे विश्व विक्रमी शतकोटी बिजारोपणास प्रारंभ..
त्या पर्यावरण प्रेमींनी वृक्षबीजांनी भरली धरती मातेची ओटी.
प्रतिनिधी मातृतीर्थ सिंदखेडराजा:- अनोख्या पद्धतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा....
काळाची गरज असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या उदात्त हेतूने मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे विश्वविक्रमी शतकोटी बिजारोणाचा प्रारंभ विविध देशी वृक्षांच्या बियांनी धरती मातेची ओटी भरून अनोख्या पद्धतीने झाला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे,पक्षी मित्र संजय गुरव, बुलढाणा जिल्हा सर्वोदय मंडळ अध्यक्षा लताताई राजपूत, सेवानिवृत्त आर एफ ओ जगन्नाथ डोईफोडे, वृक्षमित्र अभियान प्रमुख वनश्री सुधाकर देशमुख, धरती बचाओ परिवार सी एम डी वनश्री जनाबापू मेहेत्रे,राष्ट्रीय युवा संघटन जिल्हा समन्वयक क्रांती मेरत आदींनी शतकोटी बिजारोपणाची पार्श्वभूमी व पुढील दिशा विशद करत सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संयोजन वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग सिंदखेड राजा देऊळगाव राजा,वृक्षमित्र अभियान आंबेजोगाई,निसर्गाई फाऊंडेशन,नवरा बायको फाऊंडेशन,मनस्पर्शी आशय सेवा संस्था संचालित एस एम ग्रुप फाऊंडेशन यांनी केले. तर कार्यक्रमाचे व मोहिमेचे आयोजन व नेतृत्व धरती बचाओ परिवाराचे वनश्री मेहेत्रे यांनी केले.
बिजारोपणास अनुकूल स्थिती निर्माण झाल्यानंतर मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील अकराशे हेक्टरवर १०० कोटी बीजारोपणाचा संकल्प यावेळी सर्वांनी केला. कार्यक्रमाच्या निमित्ताने देशी व स्थानिक वृक्षांचे महत्त्व पटवून देण्यात आले.तर बिजारोपणातून नवनिर्मितीचा नवा संकल्प करत श्री संजय गुरव,सौ राजपूत,शाहीर कोरडे,श्री.रामदास मेहेत्रे यांनी पर्यावरण पूरक गीते सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले
बिजारोपणासाठी महाराष्ट्रभरातून विविध देशी वृक्षांच्या कोट्यवधी बिया घेऊन पर्यावरण प्रेमी कार्यक्रमास उपस्थित होते.महिलांचा उस्फूर्त सहभाग हे या कार्यक्रमाचे विशेष ठरले.
कार्यक्रम प्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वतीने उत्कर्ष कला व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापक वृंदांनी सर्व पर्यावरण प्रेमींचा सत्कार करून अभियानामध्ये सक्रिय सहभागी होऊन शतकोटी बिजारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी तन-मन धनाने सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.
तर माजी आमदार तोतारामजी कायंदे यांनी या पर्यावरण संवर्धन चळवळीचे कौतुक करत चळवळीसाठी शुभेच्छा दिल्या.तर भारतीय जैन संघटना व इश्वेद बायोटेक प्रा.लिमिटेड या मोहिमेमध्ये मोठे योगदान देणार असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वनक्षेत्रपाल सी.बी.खेर्डे, वनपाल पी.बी.पवार, जी.के.कायंदे,सुधाकर चौधरी,डॉ.प्रकाश चौधरी,शाहीर श्रीराम कोरडे,प्रा.सविता मेहेत्रे,दुर्गेश बनकर,अतुल खेकाळे,सुमोद देशमुख,सृष्टी देशमुख,निसर्गा मेहेत्रे सह धरती बचाओ परिवाराने मेहनत घेतली.
या अनोख्या कार्यक्रमास वय वर्ष ७ ते ८५ वर्षा पर्यंतचे पर्यावरण प्रेमी व सर्पमित्र दीपक माघाडे व किरण मेहेर श्रमदानास उपस्थित होते.


0 Comments