Header Ads Widget

Responsive Advertisement

आमदार अमित गोरखे यांनी आण्णा भाऊ साठे महामंडळ आणि आरटीसाठी निधीच्या मागणीसाठी वेधले सभागृहाचे लक्ष

 आमदार अमित गोरखे यांनी आण्णा भाऊ साठे महामंडळ आणि आरटीसाठी निधीच्या मागणीसाठी वेधले सभागृहाचे लक्ष



मुंबई, दि. ११ जुलै २०२५

महाराष्ट्र विधानमंडळाच्या आजच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमित गोरखे यांनी लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशी आणि आण्णा भाऊ साठे महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी शासनाच्या दुर्लक्षावर चिंता व्यक्त करत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

आमदार गोरखे यांनी सभागृहाला सांगितले की, लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या एकूण ६८ शिफारशी सरकारने स्वीकारल्या आहेत, त्यापैकी १९ शिफारशी या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाशी संबंधित आहेत. या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी आणि महामंडळाच्या विविध योजनांसाठी निधीची तातडीने आवश्यकता आहे.

ते म्हणाले, "आज अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून १४२ कोटी रुपयांची मागणी केली जात आहे. यापूर्वी दुसऱ्या टप्प्यात २१४ कोटी रुपयांची मागणी केली होती, पण आजपर्यंत हा निधी पूर्णपणे उपलब्ध झालेला नाही. यामुळे महामंडळाची कामे रखडली आहेत आणि योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळत नाही."

यासोबतच, आमदार गोरखे यांनी अण्णा भाऊ साठे संशोधन संस्था (ARTI) साठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली. ते म्हणाले, "ARTI साठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी यासाठी वेळोवेळी शासनाकडे मागणी करण्यात आली होती. मात्र, आजतागायत ARTI साठी कोणताही निधी उपलब्ध झालेला नाही. सध्या ARTI चालवण्यासाठी 'बार्टी' (BATTI) मधून काही कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला असला तरी, संस्थेच्या संशोधन कार्यासाठी आणि विस्तारासाठी २०० कोटी रुपयांचा निधी तातडीने मिळणे आवश्यक आहे."

आमदार अमित गोरखे यांनी सरकारला विनंती केली की, लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि अण्णा भाऊ साठे महामंडळ तसेच ARTI ला तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. यामुळे समाजातील वंचित घटकांना न्याय मिळेल आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांनुसार काम करणाऱ्या संस्थांना बळकटी मिळेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Post a Comment

0 Comments