Header Ads Widget

Responsive Advertisement

भिवंडी शहरातील अनधिकृत गोदामांना,परवानग्या देणाऱ्यांवर कारवाई करणार का? - भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा सवाल

भिवंडी शहरातील अनधिकृत गोदामांना,परवानग्या देणाऱ्यांवर कारवाई करणार का? - भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा सवाल



मुंबई - भिवंडी शहरात अनधिकृत गोदामे आहेत. अनधिकृत गोदामांमुळे रहिवासी भागांमध्ये धोका निर्माण झाला आहे. अनेकवेळा आगीच्या घटना घडल्या, ज्यात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या अनधिकृत गोदामांना परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी लावून कारवाई करणार का? असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. 

आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेच्या सभागृहात सदस्य निरंजन डावखरे यांनी भिवंडी शहरातील बेकायदा गोदामांबाबतची लक्षवेधी मांडली. या चर्चेत भाग घेत आ. दरेकर म्हणाले की, अवैध गोदामांच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण होताहेत. या गोदामांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ आणि कचरा तयार होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यापासून वाचता येईल. यामध्ये आजूबाजूच्या सरपंच, ग्रामपंचायतींचा मोठा सहभाग आहे. आपण एमएमआरडीएच्या माध्यमातून देखरेख करणार आहोत पण सरपंच किंवा ग्रामपंचायतीना निर्देश गेले तर उपयोग होईल. भिवंडी अनधिकृत धंदा करण्याचे हब झालेय. ज्यांनी या अवैध गोदामांना परवानग्या दिल्या आहेत त्यांची चौकशी लावून कारवाई करणार का? असा सवालही दरेकर यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. 

दरेकर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अवैध गोदामांच्या बांधकामासाठी परवानगीच घेण्यात आलेली नाही. यासाठी डिजिटल देखरेख करावी लागेल. एमएमआरडीएला तशा प्रकारची व्यवस्था उभी करण्यास सांगू. जिओ स्पेशल डेटाच्या सॅटेलाईट माध्यमातून देखरेख करावे आणि कुठे बदल झाला तर तात्काळ कारवाई करावी असे निर्देश देण्यात येतील. त्याचबरोबर यासाठी जे जबाबदार लोकं आहेत त्यांनी कारवाई का केली नाही याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वस्त केले.

00000

Post a Comment

0 Comments